Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 9.27 टीएमसी अधिक साठा !

najarkaid live by najarkaid live
August 11, 2019
in जळगाव
0
तापी नदी काठावरील नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

  • जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमध्ये
    आजपर्यंत 21.76 टीएमसी उपयुक्त साठा
    मागील वर्षीच्या तुलनेत 9.27 टीएमसी अधिक साठा शिल्लक
  •  जिल्ह्यातील हतनुर, गिरणा व वाघूर या मोठ्या प्रकल्पांत 17.71 टीएमसी उपयुक्त साठा
  • मध्यम प्रकल्पांमध्ये 2.94 टीएमसी तर लघु प्रकल्पांमध्ये 1.11 टीएमसी उपयुक्त साठा
  •  मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा, मंगरुळ, सुकी, तोंडापूर या चार प्रकल्पांमध्ये 100 टक्के उपयुक्त साठा
  • अग्नावती, हिवरा, अंजनी, भोकरबारी, मन्याड या प्रकल्पांमध्ये अद्यापही फारसा उपयुक्त साठा नाही
  • मंगरुळ, सुकी, मोर, तोंडापूर, गुळ या प्रकल्पांच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु

जळगाव, दि. 11 – जिल्ह्यातील धरण परिसरात गेल्या काही दिवासांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली असून जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये 17.71 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला असून मध्यम प्रकल्पांमध्ये 2.94 टीएमसी तर लघु प्रकल्पांमध्ये 1.11 टीएमसी असा एकूण 21.76 टीएमसी उपयुक्त साठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमध्ये फक्त 353.68 दलघफु म्हणजेच 12.49 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. त्यामाणाने यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस पडल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांचा पाणीसाठा वाढला असल्याने ही अतिशय समाधानाची बाब आहे. असे असले तरी नागरीकांनी व शेतकऱ्यांनी उपयुक्त पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प आहे. अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गुळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे तेरा मध्यम प्रकल्प आहे. तर 96 लघु प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा 1427.51 दलघमी म्हणजेच 50.40 टीएमसी इतका आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये आजपर्यंत 43.17 टक्के इतका उपयुक्त साठा शिल्लक आहे.हतनूर धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे आज दुपारी बारा वाजेपर्यंत 24 गेट पूर्ण उघडले असून धरणातून 73 हजार 713 व्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अशी माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 1027.10 दलघमी म्हणजेच 36.26 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 501.52 दलघमी म्हणजेच 17.71 टीएमसी उपयुक्त साठा आहे. यामध्ये हतनूर धरणात 1.41 टीएमसी, गिरणा 12.94 टीएमसी, तर वाघूर धरणात 3.35 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. यावर्षी आजपर्यंत हतनूर धरण क्षेत्रात 543 मिमी, गिरणा धरण क्षेत्रात 316 मिमी तर वाघूर धरण क्षेत्रात 644 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तसेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 203.91 दलघमी म्हणजेच 7.20 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 83.22 दलघमी म्हणजेच 2.94 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. तर जिल्ह्यातील लघु प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 196.50 दलघमी म्हणजेच 6.93 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 31.56 दलघमी म्हणजेच 1.11 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. जिल्ह्यातील तेरा मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा,मंगरुळ, सुकी, तोंडापूर या चार प्रकल्पांमध्ये 100 टक्के उपयुक्त साठा झाला असून मोर प्रकल्पात 71.87 टक्के, बहुळा 14.26 टक्के, गुळ 64.32 टक्के, बोरी 14.37 टक्के उपयुक्त साठा आहे. अग्नावती, हिवरा, अंजनी, भोकरबारी, मन्याड या प्रकल्पांमध्ये अद्यापही फारसा उपयुक्त साठा नाही. मात्र मंगरुळ, सुकी, मोर, तोंडापूर, गुळ या प्रकल्पांच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्लास्टीक ध्वज विक्रीस बंदी उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश !

Next Post

केरळ, कर्नाटकसह 3 राज्यांत पावसाचे 60 बळी !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
केरळ, कर्नाटकसह 3 राज्यांत पावसाचे 60 बळी !

केरळ, कर्नाटकसह 3 राज्यांत पावसाचे 60 बळी !

ताज्या बातम्या

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

February 24, 2026
LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

February 24, 2026
India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

February 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us