Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्लास्टीक ध्वज विक्रीस बंदी उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश !

najarkaid by najarkaid
August 11, 2019
in जळगाव
0
प्लास्टीक ध्वज विक्रीस बंदी उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव. दि. 11 – दरवर्षी 26 जानेवारी, 1 मे, व 15 ऑगस्ट रोजी तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी व नागरीकांकडून मोठ्या प्रमाणावर छोट्या कागदी व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. कार्यक्रम संपल्यानंतर फाटलेले, खराब झालेले राष्ट्रध्वज रस्त्यावर, कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले आढळतात, त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होते. राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्यासाठी, राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याने स्थानिक पातळीवर स्वंयसेवी संस्था, विद्यार्थी, केबल वाहिन्या व प्रसार माध्यमे यांचे सहकार्य घेऊन राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत जनजागृती करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
प्लास्टीकचे विखुरलेले राष्ट्रध्वज बरेच दिवस नष्ट होत नसल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रप्रतिष्ठेच्या दृष्टिने ही बाब अतिशय गंभीर अशी आहे. ध्वजसंहितेनुसार तसेच केंद्र शासनाकडील गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरीता प्लास्टीकच्या वापराबाबत मान्यता नाही. त्यामुळे अशाप्रकारे प्लास्टीकचे ध्वज उत्पादन वितरकांवर बंदी आणावी. तसेच विक्री करणा-यांना प्लास्टीकचे ध्वज विक्री करणेस प्रतिबंध करावा व उल्लंघन करणा-यांवर नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी. अशा सुचना श्री. वामन कदम, अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यकारी दंडाधिकारी, गटविकास अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांना दिल्या आहे.
येत्या 15 ऑगस्ट, 2019 च्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शासन परिपत्रकात दिलेल्या सूचनांनुसार राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्थानिक पातळीवर स्वंयसेवी संस्था, विद्यार्थी, केबल वाहिन्या व प्रसार माध्यमे यांचे सहकार्य घेऊन जनजागृती करावी, तसेच खराब झालेले, फाटलेले राष्ट्रध्वज विद्यार्थी, युवक मंडळे, क्रिडा मंडळे, स्वंयसेवी संस्था यांच्या मदतीने गोळा करुन त्याची ध्वजसंहितेमध्ये दिलेल्या तरतुदीनुसार विल्हेवाट लावावी, असेही अपर जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा या संदर्भात शासनामार्फत व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच जाणिवपूर्वक जर राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना होणे हे बोधचिन्हे व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950 व राष्ट्रीय अवमान कायदा 1971 तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय अपराध असल्याचेही अपर जिल्हादंडाधिकारी श्री कदम यांनी या पत्रात म्हटले आहे.
०००

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या शासन निर्णयामध्ये 14 ऑगस्टपर्यंत सुधारणा सुचविण्याचे आवाहन

Next Post

जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 9.27 टीएमसी अधिक साठा !

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
तापी नदी काठावरील नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 9.27 टीएमसी अधिक साठा !

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us