जळगाव,(प्रतिनिधी) – निर्बंध लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी संचारबंदीचा ‘नियम’ मोडून अनावश्यक फिरणाऱ्या ५१९ व्यक्तींची पोलिस विभागाकडून तपासणी करण्यात येऊन पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांना थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विनाकारण फिरणाऱ्या जिल्ह्यातील ५१९ व्यक्तींची पोलीस दलाकडून जागीच अँटिजेन तपासणी करण्यात आली असून कोविड पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल केल्याने पोलीस विभाग ‘ऍक्शन मोड’ मध्ये आल्याचं दिसून आले आहे.
तपासणीत सापडले ४८ कोरोना पॉझिटिव्ह
रावेर येथे एकूण 90 लोकांची तपासणी केली असता त्यातील 4 जणांचा पॉझिटिव्ह आल्याने त्यांना पुढील उपचार करिता कोव्हीड उपचार केंद्रात पोलिसांनी दाखल केले. काही कारण नसताना विनाकारण काहीच कारण नसतांना अनावश्यक फिरणाऱ्यांवर अशाच प्रकारे कोविड तपासणी करण्यात येणार आहे.
चोपडा शहर पोलीस ठाणे हद्दीत शिवाजी चौक येथे रस्त्यावर फिरणाऱ्या 75 व्यक्तींची antijan टेस्ट करण्यात आली त्यात १ पॉझिटिव मिळाला त्यास कोवीड सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
बोदवड येथे दिवसभरात शहरात फिरणाऱ्या
132 लोकांची टेस्ट करवून घेतली आहे, पैकी 21 पोसिटीव्ह आहेत.
एरंडोल येथे अद्यापपावेतो नगरपालिका पथकासोबत संयुक्त कारवाई दरम्यान विनाकारण फिरणाऱ्या एकूण 158 नागरिकांची रॅपिड अँटीजन चाचणी करण्यात आली त्यापैकी 09 पॉझिटिव्ह आढळून आले.
पारोळा पोस्टे आणि नगरपालिका मिळून 64 टेस्ट त्या पैकी 13 positive आढळून आले आहेत.

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शासनाने १ मे पर्यंत कडक निर्बंध लावले आहेत तरी देखील विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होतांना दिसत नसल्याने चिंता व्यक्त होतं आहे. निर्बंध लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी नियमांचा फज्जा उडवत गर्दी होतांना दिसली, रिकाम टेकडे फिरतांना दिसले असून गर्दी करणारे व अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होतं आहे.