मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’ सोबत बैठक सुरु केली असून या बैठकीतून लॉकडाऊन चा सुरु निघाल्याचं कळतं.
मुंबईसह राज्यातील नामवंत डॉक्टरांनी या बैठकीत सहभाग घेतला आहे.या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाक्स फोर्स शी चर्चा करतांना आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन हवा असं मत मांडलं. मात्र टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांनी किमान 14 दिवसांचा लॉकडाऊन लागू झाला तर परिस्थिती आटोक्यात येईल, असं मत मांडलं असल्याचं समजतं.त्यामुळे टास्क फोर्सचे तज्ज्ञ देखील लॉकडाऊनच्या बाजूने असल्याने लॉकडाऊन बाबत लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.