कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीतील पुरस्थिती भयंकर असून, राजकीय नेत्यांकडून पुरग्रस्तांची भेटी घेऊन मदत करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शस्त्रक्रिया होऊनही पुरग्रस्त भागांची पाहणी केली. राष्ट्रवादी पक्षाचा प्रत्येक आमदार खासदाराचा एक महिन्याच्या पगार मदत म्हणून देण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांच्या जिभेवर शस्त्रक्रिया झाली आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतरही शरद पवार पुरग्रस्तांच्या भेटीला गेले आहेत. जखम ओली असल्याने इन्फेक्शन होवू शकते, जावू नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र पवार यांनी पुरग्रस्त भागात पाहणी दौरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुरग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.
सोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व अन्य राष्ट्रवादीचे नेते होते. नागरिकांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.