मुंबई, (प्रतिनिधी)- मुंबईत कोरोना संसर्ग वेगाने वाढत असल्याने लॉकडाऊन तर नाही पण कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत सरकार असल्याचा सूचक इशारा आघाडी सरकारचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ट्विट केलं आहे की,मुंबईत कोरोना चा प्रादुर्भाव वेगाने होत आहे, या पार्श्वभूमीवर कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे . मुंबई लोकल बंद होणार नाही , कठोर निर्बंध मात्र नक्कीच लावण्यात येईल असा सूचक इशारा दिला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पूर्णतः लॉकडाऊन निर्बंध लावणे राज्याला परवडणार नसल्याचा सुर असल्यानं अंशत लॉकडाऊन करून मुबंईसह संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लावल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज सायंकाळी मुख्यमंत्री राज्यातील जनतेला संबोधणार आहे, यावेळी याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.