मुंबई,(प्रतिनिधी)- परमवीर सिंग यांनी दिलेल्या ‘लेटर बॉम्ब’ ची चौकशी करण्याकरिता राज्य सरकारने गठीत केलेली चांदिवाल समिती 1952 अंतर्गत नेमलेली नाही नसून जनतेला एप्रिल फुल केल्याचा आरोप भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज केल्यानंतर आघाडी सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस सरकारच्या काळातील
माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या जमीन व्यवहारासंबंधी चौकशी करिता नेमलेल्या झोटिंग कमिटीचे पत्रचं ट्विट करून या पत्रात आणि आता चांदीवाल समिती नेमलेल्या पत्रात एकाही शब्दाचे अंतर नसल्याचे सांगत भाजपाला सडेतोड उत्तर दिलं आहे.
भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली होती. यावेळी ते म्हणाले होते की,बुधवारी कैलास चांदीवाल समिती स्थापन केली. ही समिती, चौकशी आयोग अधिनियम, 1952 अंतर्गत नेमलेली नाही. त्यामुळे या समितीला कोणालाही नोटीस बजावण्याचा अधिकारच नाही. तसेच समितीकडून संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावल्यावर उपस्थित राहीलेच पाहिजे असे बंधनही नसेल. त्यामुळे ही समिती म्हणजे केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून एप्रिल फूल बनवण्याचा प्रकार असल्याची टीका भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये केली होती.
त्यावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट फडणवीस सरकारच्या काळातील खडसेंच्या जमीन व्यवहार प्रकरणी नेमलेली
झोटींग समितीचे पत्र ट्विट करून समितीला Commission of Enquiry Act अन्वये चौकशी करा, असे एखादे तरी आपल्या शासनाचे पत्र दाखवावे असा टोला भाजपाला लागवला आहे.