Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार मंगेश चव्हाण यांची चाळीसगाव कोविड सेंटरला रात्री साडेबारा वाजता भेट

najarkaid by najarkaid
March 14, 2021
in जळगाव
0
आमदार मंगेश चव्हाण यांची चाळीसगाव कोविड सेंटरला रात्री साडेबारा वाजता भेट
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चाळीसगाव हॉटस्पॉट बनत असताना लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोविड सेंटर येथे रुग्णांची होणारी वाताहात व सेंटरची झालेली दुरावस्था आमदार मंगेश चव्हाण यांच्या सरप्राईज व्हिजिट ने उघड झाली आहे.

काल दि.१३ मार्च रोजी रात्री चाळीसगाव येथील कोविड सेंटर येथून एका रुग्णाच्या तब्बेतीसंदर्भात पवार नामक व्यक्तीचा आमदार मंगेश चव्हाण यांना फोन आला असता रात्री साडेबारा वाजता आमदार चव्हाण हे कोविड सेंटर येथे दाखल झाले. त्यावेळी जे अतिशय विदारक असे चित्र कोविड सेंटरमध्ये दिसून आले त्याने रुग्णांशी सुरू असलेला जीवघेणा खेळ उघडकीस आला. राखुंडे नामक रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल १५ वर आलेली असताना त्यांना हलवण्यासाठी शासनाने जी कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे ती गेल्या ५ दिवसांपासून पंक्चर झालेली आढळली. शासन सदर कार्डियाक रुग्णवाहिकासाठी दरमहा भरमसाठ भाडे देत असताना सदर रुग्णाला साध्या व्हॅन मध्ये हलविण्यात येत होते.

तसेच त्यावेळी कोविड सेंटर येथे ४० हुन अधिक कोविड रुग्ण उपचार घेत असताना केवळ दोनच कर्मचारी त्याठिकाणी उपलब्ध असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या पाहणीत उघडकीस आले. आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने मोठ्या दातृत्वभावनेने चाळीसगाव तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या ५० लाखांहून अधिक मदतीने हे कोविड रुग्णालय व त्यातील साहित्य उभे केले होते. मात्र त्यांची देखभाल दूरची बाब आहे जी जिवंत माणसे त्याठिकाणी उपचार घेत आहेत त्यांच्याकडे देखील लक्ष द्यायला कुणी नसल्याने आमदार चव्हाण यांनी संताप व्यक्त केला.

आज कोविड येऊन एक वर्ष झाला तरी आपली आरोग्य व्यवस्था सुधारत नसेल तर शासन जो कोट्यवधीचा निधी खर्च करत आहे तो नेमका जातो कुठे हा प्रश्न निर्माण होतो. आमदार मंगेश चव्हाण यांनी मागील वर्षीच चाळीसगाव येथील कोविड सेंटर येथे जास्तीतजास्त कर्मचारी उपलब्ध करून द्यावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले, तसेच येथील स्वच्छता व देखभाल बाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच कोविड सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन व तसेच लेखी पत्र देऊन सूचना दिल्या होत्या.

कोविड काळात आरोग्य यंत्रणेने चांगले काम केले याबाबत दुमत नाही मात्र लोकप्रतिनिधी यांच्या सूचनांची दखल घेतली जात नसेल तर मलाही लोकांच्या आरोग्यासाठी कठोर भूमिका घ्यावी लागेल असा इशारा देत जर प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे एखाद्या रुग्णाचा जीव जाणार असेल तर यास संबंधित कोविड रुग्णालयाचे विभाग प्रमुख जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी मी आरोग्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सिव्हील सर्जन यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात 16 मार्च पासून ‘हे’ असतील कडक निर्बंध…

Next Post

आज जिल्हयात 979 कोरोना बाधित रुग्ण आढळले

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी रेट 7.36 टक्के इतका

आज जिल्हयात 979 कोरोना बाधित रुग्ण आढळले

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us