मुंबई, (प्रतिनिधी);- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी आज दुपारी राजीनामा दिला असून तो आजच मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांनी मंजूर देखील केला आहे.
आज दुपारी राजीनामा पत्र घेऊनच संजय राठोड हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
दरम्यान, शिवसेनेनं संजय राठोड यांच्यावर कारवाईचा निर्णय घेतला होता . संजय राठोड यांनी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटीसाठी वेळ मागितली होती. पण त्यांनी ती नाकारली होती. त्यामुळे संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागणार हे स्पष्ट झाले होते.
उद्या पासून सरकारचं बजेट अधिवेशनाला सुरवात होतं असून अधिवेशनात हा मुद्दा गाजणार होता असं चित्र दिसत होते मात्र एक दिवस आधीच मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर झाला असल्याने राजीनामा मागणीचा मुद्दा आता मागे पडला.