युपीएच्या काळात इंधनाचे दर ७० रुपये झाल्यावर टीव टीव करणारे अभिनेता अमिताभ बच्चन व अक्षय कुमार आज पेट्रोलचे दर १०० रु. झाल्यावरही गप्प का आहेत? असा सवाल उपस्थित करुन यापुढे दोघंही अभिनेत्यानंचे चित्रपटाचे शूट महाराष्ट्रात होऊ देणार नाही अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे.
सर्वसामान्य जनतेची लूट करणाऱ्या मोदी सरकारविरोधात गप्प असणाऱ्या या सेलिब्रिटींच्या चित्रपटांचे शुटींग महाराष्ट्रात होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका नाना पटोले यांनी घेतली आहे.