मुंबई, – खाकीतील ममत्व….सपोनि मधुरा कोराणे यांनी कचऱ्यात फेकून दिलेल्या बाळाला रुग्णालयात नेत जीवनदान दिल्याने या कामगिरीमुळे राज्यभर या खाकीतील ममत्वाचे कौतुक होत असतांना राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनीही आपल्या ट्विटर हॅण्डलवरून तोंडभरून कौतुक केले आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या सपोनि.मधुरा कोराणे यांनी कचऱ्यात टाकून दिलेल्या अवघ्या १ दिवसाच्या बाळाला दुचाकीवर रुग्णालयात नेऊन जीवदान दिले.कोराणे यांच्या ममत्वाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो असं ट्विट गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी केलं आहे.