Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा शहरातील सुमारे ३५०० अतिक्रमित घरे नावावर होणार; सोमवार पासून ईपीएस मोजणी प्रक्रियेस सुरुवात

najarkaid by najarkaid
January 31, 2021
in जळगाव
0
पाचोरा शहरातील सुमारे ३५०० अतिक्रमित घरे नावावर होणार; सोमवार पासून ईपीएस मोजणी प्रक्रियेस सुरुवात
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (वार्ताहर)- पाचोरा शहरातील नगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमितधारक रहिवासीयांसाठी आनंदाची बातमी असून वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली अतिक्रमित घरे राहिवाश्यांच्या स्वतःच्या नावावर लावण्याचा मार्ग मोकळा झाला असून शहरातील सुमारे ३५०० अतिक्रमीत घरे नियमानुकुल होणार आहेत .आमदार किशोर पाटील व पाचोरा नगरपालिकेच्या पुढाकाराने येत्या सोमवार पासून पाचोरा शहरातील विविध भागातील अठरा ठिकाणी वसलेल्या नागरिकांच्या घरांच्या मोजणी प्रक्रियेला इपीएस प्रणाली द्वारे गती देण्यात येणार असून आमदार किशोर पाटील यांनी शुक्रवारी भूमी अभिलेख व नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या संयुक्त बैठकीत या बाबतचे निर्देश दिले आहेत.आगामी काळात या राहिवाश्यांचे स्वतःच्या हक्काच्या घरात राहण्याचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्णत्वास येणार असल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.दरम्यान भडगाव शहरातील देखील २०११ पूर्वीच्याअतिक्रमण धारकांची यादी करण्याचे आदेश संबंधितांना दिले असून आगामी २-३ दिवसात यशवंत नगर भागासह संपूर्ण भडगाव शहरातील घरे देखील पाचोऱ्याच्याच धर्तीवर नियमित करण्यात येणार आहे.

दरम्यान शुक्रवारी ता. २९ रोजी सकाळी १० वाजता आमदार किशोर पाटील यांचे निवासस्थानी झालेल्या बैठकीस नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुकुंद बिल्डींकर, स्वीय सहाय्यक राजेश पाटील ,प्रवीण ब्राह्मणे यांचेसह मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर, भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक भगवान भोये, शहर भूमापक PV कुलकर्णी,नगररचना विभागाच्या मानसी भदाणे, यांचे सह नगरपालिका व भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या दि १७ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार सन २०११ व त्याआधीचे अतिक्रमण नियमनाकुल करण्याचे धोरण असून याबाबत पाचोरा पालिकेने पुढाकार घेतला आहे.
पाचोरा शहरातील बाहेरपूरा, बहिरमनगर,बंजारा वस्ती ,भीमनगर,भोईवाडा, गोंडवस्ती,हनुमान नगर, जनता वसाहत,कुर्बान नगर, महात्मा फुले नगर,माहेजी नाका, मिलिंद नगर,नागसेन नगर, दसेरा मैदान ( मोंढाळा रोड),रसूल नगर, श्रीराम नगर, वंजार वाडी, वरखेडी नाका भागातील सुमारे ३५०० घरे नगर पालिकेच्या नोंदी प्रमाणे अतिक्रमित असून याच्या मोजणी प्रक्रियेला सुरुवात होत आहे.यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाच्या मदतीसाठी पालिकेचे बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मधुकर सूर्यवंशी,कनिष्ठ अभियंता हिमांशू जैस्वाल,सहाय्यक प्रकाश पवार ,विलास देवरे यांचेसह कर्मचारी मदत करणार असून त्यामुळे मोजणी प्रक्रियेस गती मिळणार आहे.

राज्य शासनाच्या धोरणानुसार २०११ पूर्वीचे अतिक्रमण धारकांची घरे स्वतः च्या नावावर लावण्यासाठी पाचोरा पालिकेने पुढाकार घेतला असून यासाठी मोजणी प्रक्रिया सोमवार पासून सुरू होत आहे यासाठी लागणारी रक्कम निश्चित करून त्यावर निर्णय घेतला जाईल याच धर्तीवर भडगाव शहराचे देखील अतिक्रमण नियमनाकुल केले जाईल भडगाव शहरातील अतिक्रमण धारकांची यादी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भडगावच्या तहसीलदार तृप्ती धोडमिसे यांना जीवनदूत पुरस्कार जाहीर

Next Post

पाचोरा तालुका मेडिसिन डीलर्स असोसिएशन ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
पाचोरा तालुका मेडिसिन डीलर्स असोसिएशन ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

पाचोरा तालुका मेडिसिन डीलर्स असोसिएशन ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us