Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा झेंडा

६६ पैकी ४४ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा, ७ ग्रामपंचायत संमिश्र

najarkaid by najarkaid
January 18, 2021
in जळगाव
0
चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा झेंडा
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव प्रतिनिधी,दि.१८ – चाळीसगाव तालुक्यातील ६६ गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. यावेळी पहिल्यांदा राष्ट्रवादी-शिवसेना- कॉंग्रेस महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना रंगला होता. त्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील गटाने ४४ ग्रामपंचायतींवर बहुमत मिळवत भाजपचा झेंडा फडकवला आहे तर ७ ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक भाजप पदाधिकारी व इतर पक्षाचे पदाधिकारी यांनी मिळून बनविलेल्या पॅनल चे वर्चस्व आहे. या ७ ग्रामपंचायतींमधे देखील स्थानिक ग्रामपातळीवर सर्व पक्षांचे संमिश्र पॅनल असल्याने त्यात देखील भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत तसेच यापूर्वीच आमदार मंगेश चव्हाण यांच्या आवाहनानुसार तालुक्यातील ९ ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या असल्याने चाळीसगाव तालुक्यात भाजपचाच वरचष्मा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. विशेषतः बंजारा तांड्यामध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेने भाजपाने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे.

दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या विजयी उमेदवारांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात भेट देत जल्लोष केला. यावेळी सर्व विजयी उमेदवारांचे स्वागत आमदार मंगेश चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, माजी तालुकाध्यक्ष के बी दादा साळुंखे, पंचायत समितीचे गटनेते संजय भास्करराव पाटील, माजी सभापती दिनेशभाऊ बोरसे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर तात्या पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, पंचायत समिती सदस्य पियुषदादा साळुंखे, तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, शहर सरचिटणीस जितेंद्र वाघ, अमोल नानकर, योगेश खंडेलवाल, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार, शहराध्यक्ष भावेश कोठावदे आदी उपस्थित होते.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयाला यात्रेचे स्वरूप…

मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे विजयी उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपा कार्यालयात जमल्याने यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. सर्व विजयी उमेदवारांचा पुष्पहार व गुलाल टाकून सत्कार करण्यात आला.

भारतीय जनता पक्षाच्या ४४ ग्रामपंचायतींवर भाजपाचे वर्चस्व

तालुक्यातील टाकळी प्रदे, पिंप्री खु, नांद्र – काकळणे, अलवाडी, देशमुखवाडी, तामसवाडी, खडकी बु., तांबोळे, बिलाखेड, चितेगाव, कोदगाव – गणपूर, टाकळी प्रचा, तरवाडे, खरजई, भोरस, कळमडू, कुंझर, पोहरे, खेडी खु., दस्केबर्डी, रहीपुरी, बहाळ, टेकवाडे, पिंप्री बु प्रदे, देवळी, डोणदिगर, तमगव्हाण, वरखेडे, भउर, लोंढे, भवाळी, मुंदखेडे बु., वाघडू, हातले, मजरे, जामडी प्र.बा., रोकडे, बेलदारवाडी, बोढरे, जुनोने, शिंदी, पाटणा, ओढरे या ग्रामपंचायतींवर भाजपाने झेंडा रोवला असून पिलखोड, सायगाव, हातगाव, रोहिणी, पिंपळगाव, राजदेहरे, घोडेगाव या ग्रामपंचायतींमधे भाजपा व इतर पक्षाच्या स्थानिक आघाड्यांचे बहुमत असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम सर यांनी दिली.

आमदार मंगेश चव्हाण यांची प्रतिक्रिया –

ग्रामपंचायत निवडणूक या पक्षासाठी स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने त्यांना बळ देणे गरजेचे होते. तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे आव्हान असताना देखील मागील भाजपा शासनाने केलेल्या कामांच्या व लोकप्रतिनिधी म्हणून मागील वर्षभरात केलेल्या जनतेच्या सेवेच्या बळावर चाळीसगाव तालुक्यात बहुतांश ग्रामपंचायंतीमध्ये भाजपची सत्ता आली आहे. हे भाजपाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे यश असून आगामी काळात यशाचा हाच आलेख जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीत कायम ठेवण्याचा प्रयत्न राहील. काही गावांमध्ये जरी अपयश आले असले तरी त्या ठिकाणी अजून जास्त कामे करून जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करू. तालुक्याचा आमदार या नात्याने सर्व पक्षीय विजयी उमेदवारांचे अभिनंदन करतो. गावाच्या विकासासाठी मी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन मदत करेल असे आश्वासन देतो. ज्यांचा पराभव झाला असेल त्यांनी खचून न जाता अधिक जोमाने जनतेची सेवा करावी. आता निवडणूका संपल्या असून सर्वांनी गतकाळातील बरे – वाईट अनुभव विसरून शांततेने व एकोप्याने आपल्या गावाच्या विकासासाठी काम करावे ही विनंती —-आमदार मंगेश रमेश चव्हाण

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांना मनूर बुद्रूकमध्ये धक्का; पुतण्या सम्राट पाटलांसह पॅनल पराभूत

Next Post

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ‘संयुक्त पदवी स्तर परीक्षा २०२०’ अंतर्गत विविध पदांची भरती

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Next Post

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ‘संयुक्त पदवी स्तर परीक्षा २०२०’ अंतर्गत विविध पदांची भरती

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us