पाचोरा ( प्रतिनिधी) – ६जानेवारी पत्रकार दिनानिमित्त पाचोरा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पाचोरा तालुका अध्यक्ष विनोद अहिरे व खंडू सोनवणे यांनी पत्रकार बांधवांचा सत्कार केला.सर्वप्रथम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून लोकशाहीचा चौंथा आधार स्तंभ म्हणून ओळखले जाणारे पत्रकारांचा सत्कार केला.
यावेळी सी.एन. चौधरी सर, महेश कौण्डीले सर,आबा येवले, किशोर रायसाकडा जावीद शेख, भिमराव खैरे, सुरेश तांबे, कुंदन बेलदार, शिवाजी शिंदे, गणेश शिंदे,आत्माराम गायकवाड, यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.त्यावेळी खंडू सोनवणे, गोवर्धन जाधव,सह प्रदिप चौधरी, उपस्थित होते.