जळगाव, (प्रतिनिधी) – पत्रकारांचे अनेक प्रश्न आहेत, ग्रामीण वार्ताहरांना अधिस्वीकृती कार्ड मिळणेबाबत, पेन्शन योजना,कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांना 50 लाखाचा विमा लागू करणे अशा अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित असल्याचं महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले असून आपण या मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैया पाटील यांनी पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलतांना सांगितलं.
जळगाव ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.कल्पनाताई पाटील यांनी पत्रकार दिना निमित्त पत्रकारांना सन्मानित करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.
पत्रकारांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका सामाजिक जाणिवेतून या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी महिला व महानगर आघाडी तर्फे करण्यात आल्याचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसंगी बोलतांना कल्पनाताई पाटील म्हणाल्या.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष रवींद्रभैया पाटील,जेष्ठ पत्रकार विजय पाठक, चंदू नेवे,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे,श्रीमती शांता वाणी,सुरेश उज्जनवार यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सुत्र संचालन वाय एस महाजन सर व आभार प्रदर्शन सलीम इनामदार यांनी केले.या कार्यक्रमाला सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर व ग्रामीण चे महिला व पुरुष पदाधिकारी हजर होते.