Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गतील ‘वाहन सेवा’ अचानक थांबली !

वाहन सेवा खंडित ; राष्ट्रीय कार्यक्रमात अडथळा; सेवा पुरविणाऱ्या कंत्राटदार संस्थेला जिल्हा शल्य चिकित्सक यांनी काढले पत्र ; कारवाईची अपेक्षा

najarkaid by najarkaid
December 26, 2020
in जळगाव
0
जिल्ह्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गतील ‘वाहन सेवा’ अचानक थांबली !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत पुरविण्यात येणारी 45 वाहनांची ‘वाहन सेवा’ गेल्या पंधरा दिवसा पासून अचानक थांबली असल्याने जिल्ह्यातील अंगणवाडी व शालेय आरोग्य तपासणीचे कामकाज पूर्णतः बंद पडल्यानं आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. या प्रकरणी कंत्राटदार संस्था श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा संस्था मर्यादित, नाशिक यांना जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दि.22 डिसेंबर रोजी पत्र काढून सेवा सुरु करण्याबाबत निर्देश दिले व अहवाल सादर करण्याचं सांगितलं आहे.

जिल्ह्यातील 46 पथकांचं काम थांबलं
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम नुसार जिल्हा रुग्णालय जळगाव अंतर्गत एकूण 46 आरबीएसके पथके कार्यरत केले आहे.46 पैकी 45 पथकांना वाहने पुरविण्यात आलेली आहे. सदर वाहने ही दि.14 डिसेंबर पासून उपलब्ध झालेली नाही.यामुळे आरोग्य तपासणी करणेस अडथळा निर्माण झाला आहे.यामुळे जिल्ह्यातील 46 पथकांचे काम थांबले आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी काढलं पत्र…

कुठलीही पूर्वसूचना न देता जिल्ह्यातील 45 वाहनांची सेवा खंडित केली यामुळे राष्ट्रीय कार्यात अडथळा निर्माण झाल्याचा ठपका जिल्हा शल्यचिकित्सक यांनी ठेवत कंत्राटदार संस्था श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवाभावी संस्था मर्या.नाशिक यांना थेट पत्र काढलं असून पत्रात अंगणवाडी व इयत्ता 9 ते 12 पर्यंत शाळा सुरु झालेली आहे.

सदर अंगणवाडी व शाळा आरोग्य तपासणी करणे तसेच कोविड कामकाजाकरिता वाहनांची आवश्यकता आहे. वाहने बंद असल्याने आरोग्य तपासणी करण्यास अडचणी येत आहे. यामुळे राष्ट्रीय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. हे अत्यंत खेदजनक बाब आहे. तात्काळ वाहने सुरु करुन तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा असं म्हटलं आहे.

काय आहे योजना…

राज्‍यातील सर्व जिल्‍हयांत राष्‍ट्रीय बाल स्‍वास्‍थ कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमात ० ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्‍य तपासणी करण्‍यासाठी राज्‍यात ११३० पथके कार्यरत आहेत. प्रत्‍येक पथकात २ वैदयकीय अधिकारी (१ पुरुष व १ स्त्री ), १ आरोग्‍य सेविका व १ औषध निर्माता यांचा समावेश आहे. तालुकास्‍तरावरील ग्रामीण / उपजिल्‍हा रुग्‍णालये येथे या पथकांचे मुख्‍यालय करण्‍यात आले आहे.
सध्‍या या पथकांद्वारे ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडीतील बालकांची व शालेय विदयार्थ्‍याची आरोग्‍य तपासणी करण्‍यात येत आहे.

सदर पथकांना मुलांची तपासणी करण्‍यासाठी आवश्‍यक ती वैदयकीय उपकरणे व औषधे यांची किट देण्‍यात आलेली आहे. पथकामार्फत तपासणी केल्‍यानंतर विदयार्थ्‍यांना संदर्भसेवा ग्रामीण / उपजिल्‍हा रुग्‍णालये व जिल्‍हा रुग्‍णालये येथे दिल्‍या जातात.या पथकांना फिरण्यासाठी या कार्यक्रमा अंतर्गत ‘वाहन सेवा’ पुरविण्यात येते यामुळे पथकांना खेडोपाडी जाऊन आरोग्य तपासण्या करण्यास मदत होते.

कंत्राटदार संस्थेवर कारवाई अपेक्षित

अत्यावश्यक असणारी सेवा ‘वाहन सेवा’ अचानक पूर्वसूचना न देता बंद झाल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली असून कोरोनासारख्या महामारीत वाहन सेवा बंद केल्याने कंत्राटदार संस्थेने शासनासोबत केलेला करार भंग केला असून अशा संस्थांवर ‘काळ्या यादीत’ टाकण्याची कारवाई होणे अपेक्षित आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सर्वात मोठी बातमी : माजी मंत्री एकनाथ खडसेंना ‘ईडी’ची नोटीस !

Next Post

प्रफुल्ल लोढा राष्ट्रवादी पक्षाचा सभासद देखील नाही – रवींद्रभैया पाटील

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
प्रफुल्ल लोढा राष्ट्रवादी पक्षाचा सभासद देखील नाही – रवींद्रभैया पाटील

प्रफुल्ल लोढा राष्ट्रवादी पक्षाचा सभासद देखील नाही - रवींद्रभैया पाटील

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us