जळगाव,(प्रतिनिधी)- श्री राजपूतकरणी सेना सैनिक यांचा उद्या दि.20 रोजी दुपारी 12 वाजता परेश रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आला असून यावेळी प्रमुख मार्गदर्शक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्रसिंग चव्हाण यांची उपस्थिती असणारं असल्याची माहिती खान्देश विभाग प्रमुख प्रविणसिंग पाटील यांनी दिली आहे.
श्री राजपूतकरणी सेनेच्या या मेळाव्याला राज्यभरातून विविध पदाधिकारी उपस्थित राहणार असून संघटन बांधणी, संघटनेची भूमिका, उद्देश या विषयावर चर्चा होणार आहे.