राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीयमंत्री खा.शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधत पवारांनी घेतलेल्या ८० निर्णयांची माहिती दररोज दोन प्रमाणे आमदार रोहित पवार उपलब्ध करुन देणार असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून दिली आहे.
शरद पवार यांनी आपल्या कारकिर्दीत घेतलेल्या अनेक निर्णयांची फळं आज महाराष्ट्र आणि देशाला चाखायला मिळतायेत. साहेबांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी घेतलेल्या ८० निर्णयांची माहिती दररोज २ याप्रमाणे पुढील चाळीस दिवस कृतज्ञतापूर्वक देण्याचा माझा प्रयत्न राहील. हे निर्णय जरुर वाचा असं अवाहन देखील आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.















