जळगांव – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दल या सामाजिक संघटनेत जळगाव जिल्ह्यातील स्वाभिमानी भारत अभियान विलीन करण्यात आल्याचा निर्णय दि. 4 ऑगस्ट 2019 रोजी जळगांव शहरातील पद्मालय रेस्टहाऊस, या ठिकाणी घेण्यात आला.
सदर बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून धर्मभूषण बागुल (माजी मुख्यसंयोजक)उपस्थित होते. बैठकच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विजय निकम होते.बैठकीत संघटनाचा आढावा घेतला गेला.बैठकीत संघटना च्या नाव बदल बाबत चर्चा करण्यात आली. समता सैनिक दलच्या बाबतीत चर्चा करण्यात आली. आणि सर्व कार्यकर्ते यांना समता सैनिक दल बदल माहिती देण्यात आली. समता सैनिक दल डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली आहे.आणि आपल्याला समता सैनिक दल समाजाला संघटित करण्याचे कार्य करीत आहे.समता सैनिक दल शोषण विरुध्दत लढा देत आहे. आणि आज देशातील उपेक्षित शोषित अन्यायग्रस्त अनुसूचित जाती ,जमाती ओबीसी अल्पसंख्याक समूहाला न्याय देऊ शकते.कारण बाबासाहेब आंबेडकरांनी देशांतील प्रत्येक घटकासाठी काम केले आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या मातृसंस्था आपण वाढविल्या ही आपली सर्वांची जवाबदारी आहे.
उपस्थित सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सर्वानी सहमती देत स्वाभिमानी भारत अभियान समता सैनिक दल मध्ये विलीनीकरण करावे असा निर्णय घेऊन स्वाभिमानी भारत अभियान विलीनीकरण करण्यात आले.या बाबत दोन महिन्यांनी जाहीर कार्यक्रम घेण्यात येईल असाही निर्णय घेण्यात येणार असल्याचे विजय निकम यांनी कळविले आहे.