जळगाव, (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी कार्यालयात कालच्या आयोजित बैठकीत एका बॅनरवर राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. सतीशअण्णा पाटील यांचा फोटो नसल्याने त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे एकनाथ खडसेंच्या उपस्थितीतील पहिल्याच बैठकीत ‘नाराजीनाट्य’ रंगल्याची दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा होती. या नाराजी बाबत आज माजी मंत्री डॉ. सतीशअण्णा पाटील यांनी ‘नजरकैद’ शी बोलतांना खुलासा केला आहे.

कालची बैठक ही आमचे नेते शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या नियोजन संदर्भात होती. या निमित्ताने जे बॅनर लावण्यात आले ते काही पक्षाचे अधिकृत बॅनर नसून बढे, चव्हाण व्यक्तींचे वैयक्तिक बॅनर होते… माझा त्यांनी फोटो घ्यावा किंवा नाही याच्याशी माझा संबंध येत नाही. बॅनरवर माझा कोणी माझा फोटो घेतला किंवा नाही घेतला तर काही फरक पडत नाही.ते बॅनर म्हणजे पक्ष नाही.जर पक्षाचं बॅनर असतं आणि माझा फोटो नसता त्यावेळेस नाराजीचा विषय आला असता परंतु मी शरद पवार साहेबांचा ‘सच्चा कार्यकर्ता’ आहे त्यामुळे कालच्या विषयावर नाराज होण्याचं कारण नाही मी नाराज नाही असं स्पष्ट केले आहे.
बाहेर गावी असल्याने बैठकीला हजर नव्हतो…
मी नाराज नाहीच असं स्पष्ट केल्यानंतर डॉ.सतीशअण्णा पाटील यांनी कालच्या बैठकीला गैरहजर असण्याबाबत देखील खुलासा केला असून मी बाहेर असल्यानेच बैठकीला हजर राहता आले नाही.

माजी मंत्री एकनाथराव खडसे तसेच जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे- खेवलकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्या नंतर राष्ट्रवादी च्या पहिल्याच बैठकीत माजी आमदार सतीश पाटील यांचा बॅनर वर फोटो नसल्यानेदिवसभर ‘नाराजीनाट्य’ची काल चर्चा दिवसभर रंगली.
















