कुऱ्हे पानाचे, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जिल्हा जळगाव शाखेच्या वतीने भुसावळ तालुक्यातील माध्यमिक विभागातून कुऱ्हे पानाचे येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील तथा तंत्रस्नेही शिक्षक योगेश गांधेले यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक व तंत्रस्नेही शिक्षक म्हणून केलेल्या कामाची दखल घेऊन, त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचा सर्वोत्कृष्ट समजला जाणारा पुरस्कार म्हणजे गुणवंत शिक्षक पुरस्कार राज्य समता शिक्षक परिषदेच्या वतीने बहाल करण्यात आला आहे.
आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळावं व आपण करीत असलेल्या महान कार्य द्विगुणित व्हावे म्हणून प्रत्येक वर्षी तात्यासाहेब ज्योतिराव फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षक दिन साजरा करीत असतो. या दिनाला महत्त्व प्राप्त व्हावं तसेच आपल्या शिक्षक बांधवांच्या प्रामाणिक व विधायक कार्याची दखल घेतली जावी म्हणूनच प्रत्येक वर्षी हा पुरस्कार बहाल केला जात असतो. “काम हाच आमचा वशिला – गुणवत्ता हीच आमची मालमत्ता” या ब्रीद च्या अनुषंगाने भुसावळ तालुक्यातील माध्यमिक विभागातून गांधेले यांची निवड गुणवंत शिक्षक म्हणून केली आहे.
















