भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत हिंदुत्वाच्या मुद्यावरून आरोप प्रत्यारोप सुरु असतांना खासदार तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान हिंदुत्वाच्या मुद्यावर बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे का?, हिंदुत्व आमच्या धमन्यांमध्ये असल्याचं म्हटलं होतं त्यावर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका करीत भाजपाचे हिंदूत्व बदललेले नाही.
पण हिंदूत्व जर तुमच्या धमण्यांमध्ये वाहतं तर कुणासोबत मांडीला मांडी लावून बसता?
वीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांसोबत?
शिवसेनेने आता हिंदूत्व सोडले आहे असं ट्विट केलं आहे.
शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत सत्ता स्थापनेच्या संघर्षात फारकत घेतली तेव्हा पासून भाजपा शिवसेनेवर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करीत असून याबाबत भाजप एकही संधी सोडतांना दिसत नाही. दुसरीकडे शिवसेना आपल्याला हिंदुत्वाच्या दाखल्याची कुणाकडून गरज नाही असं म्हणत शिवसेना हिंदुत्ववादी असल्याचं नेहमीच जाहीर करत आले आहे.