जळगाव – संविधान प्रत्येक भारतीय नागरीकाच्या जगण्याचा आणि जागविण्याचा मार्ग असून देशाच्या संविधानाप्रती प्रत्येकाने आपल्या कर्तव्य भावनेतून आदर करणे गरजेचे असल्याचे मत समाजकल्याण
सभापती जयपाल भाऊ बोदडे यांनी संविधान गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले . कार्यक्रमास जि.प. सदस्य निलेश पाटील, वनिताताई गवळे, कु. वैशालीताई तायडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील,विजयकुमार मौर्य,भिकारी बोदडे राज्य संघटक,विजय मेढे राज्य संघटक महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण महासंघ हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला व संविधानाचे पूजन करण्यात आले.प्रास्ताविकेचे वाचन डॉ.मिलिंद बागुल यांनी केले.याप्रसंगी प्रतापजी बोदडे,बी.जे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास सुनिल सोनवणे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ जळगाव,आर टी सोनवणे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब जि.प.कर्मचारी महासंघ जळगाव, विजय लुल्हे,फिरोज पठाण, किशोर वानखेडे,आर एम कांबळे,सुरेश तायडे,रमेश सोनवणे,पुरुषोत्तम पारधे,निकम सर, जितेंद्र बारी,नुतन तासखेडकर,प्रमिला मेढे,रत्ना तांबे, लक्ष्मी गायकवाड, माधुरी बेहरे,संगिता सपकाळे, मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक अनिल सुरडकर विगागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ नाशिक यांनी तर सुत्रसंचलन बापूराव पानपाटील यांनी केले.