बोदवड – (अर्जुन आसने) :- उपसंचालक परिपत्रक क्र.नपप्रसं / Ngr / Chilled water Plants / का .७ / २०२० / १४३७ दि .२२ जुलै २०२० या परिपत्रक नुसार राज्यात सुरू असलेले चिल्ड वॉटर प्लाँट बंद करण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत.त्यानुसार , बोदवड येथील आठ प्लॉटधारकांना नगरपंचायतीने नोटीस बजावल्या आहेत.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दाखल केलेल्या याचिकेच्या निकालानुसार , महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्रात चिल्ड वॉटर सप्लायच्या नावाखाली बंद जार कॅनमध्ये सर्रासपणे घरोघर तसेच कार्यालय व लग्न समारंभ या ठिकाणी विकले जाणाऱ्या थंड पाण्याचे जार हे अन्न भेसळ प्रशासन तसेच गुणवत्ता निरीक्षण त्याचप्रमाणे पाण्याचे पेस्ट कंट्रोल व प्रदूषण नियंत्रण मंडळाची
परवानगी न घेता बेकायदेशीररित्या सुरू आहे .
या सर्व प्लँटना बंद करण्याचे आदेश उपसंचालक , महाराष्ट्र शासन नगरपरिषद प्रशासन संचालनालय , मुंबई यांनी राज्यातील सर्व महानगरपालिका नगरपालिका , नगरपंचायतींना काढले आहे . त्या अनुषंगाने बोदवड शहरात असलेल्या आठ वॉटर प्लॉटधारकांना दि.२ नोव्हेंबर रोजी नोटीस पाठवण्यात आली होती व तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती . वॉटर प्लॉटचालकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी तसेच अन्न भेसळ प्रशासनाची परवानगी , पाणी शुद्धीकरणासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या परवानग्या असल्यास तीन दिवसात सादर कराव्या अन्यथा हे प्लाँट सुरू असल्यास सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे . या आशयाचे पत्र नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी २ रोजी प्रसिद्ध केले आहे . परंतु आजही हे प्लाँट कागदपत्रे सादर न करता बिनदिक्कत सुरू आहेत . काही प्लाँट हे राजकीय पदाधिकारी तसेच पुढारी यांच्या पुत्राच्या मालकीचे असून , यातील एकाकडेही परवानगी नसून संबंधित अधिकारी यांच्यावर काय कारवाई करणार याकडे बोदवड वासियांचे लक्ष लागून आहेत
















