खिर्डी प्रतिनिधी:- खिर्डी खु येथील स्टेशन वरील स्ट्रीट लाईट पोल काही वर्षांपूर्वी वाळू च्या ट्रॅक्टर ने धडक दिल्याने तुटला असून आज पर्यंत त्या ठिकाणी नवीन विद्युत पोल बसविण्यात आला नाही स्टेशन रोड नेहमी वर्दळीचा असल्याने रात्री बे रात्री प्रवाशांची व शेतकरी वर्गाची ये -जा होत असून अंधारात साप विंचू काट्याची भीती निर्माण झाल्याने नागरिक सुद्धा येण्यास धजावत नाही तरी लवकरात लवकर संबंधित विभागाने त्वरित दखल घ्यावी अशी मागणी गावातील सुज्ञ नागरिकांनी केलेली आहे.
















