पाचोरा –क्षत्रिय माळी समाज पंच मंडळातर्फे संत सावता महाराज पुण्यतिथी दि.३१ जुलै रोजी सकाळी ८.०० वा. समाज कार्यालयावर संत सावता माळी मंदिरात मूर्ती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणुकीला कोंडवाडा गल्ली येथून सुरुवात झाली.
जुने विठ्ठल मंदिर ,देशमुखवाडी,बाहेरपुरा,कृष्णापुरी या मार्गे नवीन विठ्ठल मंदिर येथे मिरवणुकीची सांगता झाली.तसेच पालखी मिरवणुकीत भाविक भक्तांना अल्पोहार चहा सेवा करणारे श्री.प्रल्हाद देवचंद महाजन,भरत जगन्नाथ चौधरी,मधुकर रामदास महाजन,यांच्या सौजन्याने वाटप झाले.तसेच कृष्णापुरी भागातील संत तुकाराम महाराज बीज उत्सव समिती तर्फे पालखीचे स्वागत करण्यात आले तसेच चहा वाटपाचा कार्यक्रम झाला.पुढे श्री.बाजीराव सयाजी महाजन यांच्या निवासस्थानी अल्पोहाराचे वाटप झाले.
पालखी मिरवणुकीत पी.टी.सी. चेअरमन संजयनाना वाघ,युवा नेते अमोलभाऊ शिंदे यांनी प्रतिमा पूजन करून मिरवणुकीत सहभाग घेतला.पूर्ण मिरवणुकीत विविध सामाजिक राजकीय व्यक्तींनी आपली उपस्थिती दिली.
दुपारी १२.०० वाजेपासून नवीन विठ्ठल मंदिर येथे महाप्रसादाला सुरुवात झाली.सर्व बहुजन समाज बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच २४ जुलै पासून सुरु असलेल्या हरिनाम कीर्तन सप्ताहाची ह.भ.प.पांडुरंग महाराज यांच्या कालाच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.
संत सावता महाराज पुण्यतिथी मिरवणुकीत पाचोरा पंचक्रोशीतील भजनी मंडळी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.तसेच माळी समाजातील सर्व महिला व पुरुषांनी विशेष गणवेश परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
आठवड्याभरा पासून सुरु असलेल्या या विविध कार्यक्रमासाठी पंच मंडळाचे अध्यक्ष संतोष भास्कर महाजन,सचिव गजानन रामदास महाजन,उपाध्यक्ष मयूर सुधाकर महाजन,बंटी महाजन,शंकर भिला महाजन,सहसचिव नाना सांडू महाजन,कोषाध्यक्ष चिंधू मोकळ,जिल्हाध्यक्ष विठ्ठल एकनाथ महाजन(माऊली),सुनिल महाजन,कन्हैय्या देवरे,शुभम महाजन,प्रदीप महाजन,शरद गीते सर्,बबलू महाजन,नत्थू महाजन,अनिल बागुल,नामदेव महाजन.अनिल महाजन सर्,गजानन गोरख महाजन,भाऊसाहेब महाजन,मधुकर रामदास महाजन,श्रीराम मोतीराम महाले,संदीप पाटील,ज्ञानेश्वर महाजन,नगरसेवक वासुदेव महाजन,भास्कर सुकदेव महाजन,मधुकर सुकदेव महाजन,सुनील उमाळे,दिलीप रोकडे,प्रमोद महाजन इ. समाज बांधवांचे सहकार्य लाभले.