Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांचा ठाकरे कुटुंबावर ‘हल्लाबोल’

ठाकरे परिवाराचा व्यवसाय आहे तरी कोणता ? : मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे - भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांची मागणी

najarkaid live by najarkaid live
November 19, 2020
in राजकारण
0
भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांचा ठाकरे कुटुंबावर ‘हल्लाबोल’
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई, – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्ती संदर्भात दिलेली माहिती तसेच रश्मी ठाकरे यांच्या जमीन खरेदीबाबत उपलब्ध झालेली कागदपत्रे पाहता ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय जमीन खरेदीचा की इमारती बांधण्याचा (बिल्डर) आहे याबाबत मुख्यमंत्र्यांनी एकदा स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी करून पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबियांवर हल्लाबोल भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

डॉ. सोमैया यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीबाबत दिलेल्या माहितीची कागदपत्रे सादर केली. डॉ. सोमैया म्हणाले की, आदित्य ठाकरे हे 31 मार्च 2020 पर्यंत हिबिस्कस फूड एलएलपी, एलिओरा सोलर एलएलपी या कंपन्यांचे डेझिग्नेटेड  पार्टनर होते असे दिसते आहे. मंत्री बनल्यावर जवळपास 4 महिने ते एखाद्या कंपनीचे संचालक म्हणून कसे राहू शकतात? कंपनीचा डेझिग्नेटेड पार्टनर हे पद लाभाचे (ऑफिस ऑफ प्रॉफिट) नाही का? याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे.

उद्धव ठाकरे यांच्या प्रतिज्ञापत्रात पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर असलेल्या खालापूर तालुक्यातील वैजनाथ येथील जमिनीचा उल्लेख आहे. या जमिनीचा उल्लेख करताना एकाच सर्व्हे क्रमांकाच्या जमिनीचा उल्लेख दोन वेळा करण्यात आला आहे. हा प्रकार संशयास्पद असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनीच याबाबत खुलासा करणे आवश्यक आहे, असे डॉ. सोमैया यांनी सांगितले.

डॉ. सोमैया यांनी सांगितले की, मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात ठाकरे परिवार व अन्वय मधुकर नाईक परिवारासोबत 30 जमीन खरेदी करार झालेले दिसत आहेत. या सर्व व्यवहारांच्या  7/12 उताऱ्यांवर ‘सदर जमीन लागवडीस अयोग्य” असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या व्यवहारांवरून काही प्रश्न उपस्थित होत आहेत त्यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा अशी महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे.

  1. सौ.रश्मी उद्धव ठाकरे व सौ.मनिषा रविंद्र वायकर म्हणजे श्री. उद्धव ठाकरे व श्री. रविंद्र वायकर या दोन्ही परिवारामध्ये कोणत्या स्वरूपाचे आर्थिक संबंध आहेत?
  2. ठाकरे व वायकर या दोन्ही परिवारामध्ये व्यावसायिक संबंध आहेत का?त्यांची बिझिनेस पार्टनरशिप आहे का?या दोघांनी अशाप्रकारे संयुक्त व्यवहार अन्यत्र केले आहेत का?
  3. सौ. रश्मी उद्धव ठाकरे यांचे कोर्लई येथील 30 जमीन खरेदीचे7/12 उतारे आम्हांला सापडले आहेत. माननीय उद्धव ठाकरे यांच्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे सौ. रश्मी उद्धव ठाकरे यांच्या नावाने एकंदर 40 7/12 उतारे आहेत, त्यापैकी 30 7/12 उतारे हे सौ. रश्मी उद्धव ठाकरे व अन्वय मधुकर नाईक परिवाराचे आहेत.
  4. हे 7/12 उतारे पाहिल्यास लक्षात येते की,ही जमीन लागवडीस अयोग्य आहे. हे जमीन सीआर झोन मध्ये आहेत का?मग या जागा विकत घेण्यामागे ठाकरे परिवार व वायकर परिवाराचा उद्देश काय होता? ठाकरे परिवाराचे माननीय उद्धव ठाकरे, सौ. रश्मी उद्धव ठाकरे व श्री. आदित्य ठाकरे यांचे आर्थिक व्यवहार, प्रतिज्ञापत्रामधील माहिती बघितल्यास एक प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेस पडत आहे की त्यांचा व्यवसाय काय आहे? ठाकरे परिवाराचा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी मध्ये भाग आहे का? पार्टनरशिप आहे का?

 जनतेच्या मनात उत्सुकता आहे की मुख्यमंत्री ठाकरे परिवाराचा मूळ व्यवसाय काय? जमीन घेणे -विकणे, बांधकाम क्षेत्र, इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या, अनेक कंपन्यांमध्ये ते संचालक होते, आहेत. अनेक कंपन्यांमध्ये ते शेअरहोल्डिंग आहेत. अनेक कंपन्यांमध्ये ते पार्टनर दिसत आहेत.  त्यामुळे त्यांचा  मूळ व्यवसाय काय यासंबंधी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माहिती जाहीर करावी अशी आमची मागणी आहे.


Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाबाबत निवडणूक आयुक्तांची मोठी घोषणा !

Next Post

आता 2021 च्या हज यात्रेसाठी अर्ज करता येणार…

Related Posts

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला नागपूर येथे प्रारंभ

भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला नागपूर येथे प्रारंभ

December 23, 2024
महाराष्ट्रात देवेंद्र पर्व सुरु! फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

महाराष्ट्रात देवेंद्र पर्व सुरु! फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

December 5, 2024
देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, गिरीष महाजणांनी केलं अभिनंदन

देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, गिरीष महाजणांनी केलं अभिनंदन

December 4, 2024
आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी वाचा

आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी वाचा

December 4, 2024
महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत आज झंझावाती प्रचार

ब्रेकिंग ; आ. किशोरअप्पा पाटील यांना राज्य मंत्रिपद मिळण्याची शक्यता!

December 4, 2024
Next Post
आता 2021 च्या हज यात्रेसाठी अर्ज करता येणार…

आता 2021 च्या हज यात्रेसाठी अर्ज करता येणार...

ताज्या बातम्या

New Vehicle Tax System Maharashtra

New Vehicle Tax System Maharashtra ; वाहन खरेदी महागणार

July 2, 2025
Electric bus jalgaon

Electric Bus Jalgaon | जळगावमध्ये स्मार्ट ई-बस सेवा लवकरच सुरू होणार!

July 2, 2025
How to Earn Money from Home in 2025

घरबसल्या पैसे कसे कमवायचे? २०२५ मध्ये ऑनलाईन पैसे कमवण्याचे सर्वोत्तम मार्ग

July 1, 2025
Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
Diabetes Information in Marathi

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय | Diabetes Information in Marathi

July 1, 2025
Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
Load More
New Vehicle Tax System Maharashtra

New Vehicle Tax System Maharashtra ; वाहन खरेदी महागणार

July 2, 2025
Electric bus jalgaon

Electric Bus Jalgaon | जळगावमध्ये स्मार्ट ई-बस सेवा लवकरच सुरू होणार!

July 2, 2025
How to Earn Money from Home in 2025

घरबसल्या पैसे कसे कमवायचे? २०२५ मध्ये ऑनलाईन पैसे कमवण्याचे सर्वोत्तम मार्ग

July 1, 2025
Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
Diabetes Information in Marathi

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय | Diabetes Information in Marathi

July 1, 2025
Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us