Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे तीन निर्णय

najarkaid by najarkaid
November 19, 2020
in जळगाव, राज्य
0
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी 2 हजार 297 कोटी 6 लाख 37 हजार रुपयांचा निधी वितरित
ADVERTISEMENT

Spread the love

शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंप
वीज जोडण्यांसाठी नवीन धोरण जाहीर

नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले.

त्यामध्ये लघुदाब वाहिनी, उच्चदाब वाहिनी, सर्विस कनेक्शन व सौर कृषीपंप याव्दारे वीज जोडणी देण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून राज्यभर सुमारे एक लाख कृषीपंप वीज जोडण्या दरवर्षी देण्यात येणार आहेत. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

या योजनेअंतर्गत सर्व कृषी ग्राहकांना तीन वर्षात टप्प्याटप्याने कायमस्वरूपी दिवसा 8 तास वीज पुरवठा करण्याचे नियोजन आहे. कृषी फिडर व वितरण रोहित्रावरील मिटर अद्ययावत करणे इ. कामे करण्यात येणार आहेत. तसेच सद्य:स्थितीत कार्यरत असणाऱ्या कृषीपंपाना कॅपॅसिटर बसविण्यात येणार आहेत.

यासाठी पायाभुत सुविधांच्या खर्चापोटी शासनामार्फत दरवर्षी 1500 कोटी रुपये याप्रमाणे 2024 पर्यंत भागभांडवल स्वरूपात निधी महावितरण कंपनीस देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

याशिवाय मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत दरवर्षी एक लाख सौर कृषीपंप देण्यात येणार आहेत. कृषी ग्राहकांना दिवसा 8 तास वीज पुरवठा करण्याकरिता वितरण उपकेंद्र स्तरावर विकेंद्रित सौरऊर्जा प्रकल्प उभारून वीज निर्मिती करून वीज पुरवठा करण्याची दीर्घकालीन योजना राबविण्यात येणार आहे.

कृषी ग्राहकांची थकबाकी वसूल करण्याकरिता ग्रामविद्युत व्यवस्थापक, ग्रामपंचायत, शेतकरी सहकारी संस्था, महिला बचत गट यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कृषीपंपांची पाच वर्षापुर्वीची व पाच वर्षापर्यंतची थकबाकी व्याज व विलंब आकारात सूट देऊन सुधारित करण्यात येणार आहे. सदर थकबाकीची रक्कम 3 वर्षात भरण्याची मुभा असणार आहे. पहिल्या वर्षी भरलेल्या रकमेवर 100 टक्के सुट, दुसऱ्या वर्षी 30 टक्के सुट व तिसऱ्या वर्षी 20 टक्के सुट देण्यात येणार आहे. सदर थकबाकी वसुलीच्या रक्कमेपैकी 33 टक्के रक्कम संबधित ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील, 33 टक्के रक्कम संबधित जिल्हयातील व 33 टक्के रक्‍कम राज्यातील कृषीपंप वीज जोडणीच्या पायाभुत सुविधांकरिता वापरण्यात येणार आहे. अशा प्रकारे कृषीपंप धोरण राज्यात राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

—–०—–

सार्वजनिक बांधकाम विभाग

सा.बां.विभागाच्या प्रकल्पांवर केवळ जड वाहनांवरील
पथकरात काही प्रमाणात वाढ
——————-
हलक्या वाहनांवरील सूट कायमच

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खासगीकरण प्रकल्पांवर केवळ जड वाहनांसाठी पथकर दरामध्ये काही प्रमाणात वाढ करण्याचा तसेच कार, जीप, एसटी व स्कूल बसेस व हलकी वाहने यांची सूट कायम ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

ही वाढ सुमारे 10 टक्के असून प्रस्तावित वाढीव दर हे राष्ट्रीय महामार्गावरील पथकरांच्या तुलनेत कमीच आहेत. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

सध्या राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 15 प्रकल्पांतर्गत वाहनांना पथकरातून सूट देणे सुरु आहे. ही सूट दिल्यामुळे या पथकर उद्योजकांना शासनास 350 ते 400 कोटी नुकसान भरपाई दरवर्षी द्यावी लागते. ही नुकसान भरपाई रोखीने न देता जड वाहनांवरील पथकर काही प्रमाणात वाढविण्याचा तसेच या पथकर वसुलीसाठी वाहनांचे प्रकार देखील वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी खालील प्रमाणे वाहनांचे चार प्रकार होते.

1) कार, जीप, टाटा सुमो, कमांडर, ट्रॅक्स, वाहनचालक वगळून 6 आसनी प्रवासी रिक्षा व इतर तत्सम
2) मिनी बस किंवा तत्सम वाहने
3) 2 आसांचे ट्रक, बस
4) 3 आसांची अवजड वाहने
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे वाहनांचे प्रकार वाढवून 5 इतके करण्याचा निर्णय झाला. याप्रमाणे ट्रक-ट्रेलर, तीन पेक्षा अधिक आसांची वाहने हा प्रकार नव्याने समाविष्ट करण्यात आला.
——०—–

कृषी विभाग

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पास
कोटक महिंद्रा बॅंकेतील खाते चालू ठेवण्यास मान्यता

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या डीबीटी प्रणालीसाठी कोटक महिंद्रा बॅंकेत उघडलेले खाते चालू ठेवण्यास विशेष बाब म्हणून सूट देण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

महा-डीबीटी पोर्टलद्वारे नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाकरिता डीबीटी प्रणाली विकसित होईपर्यत/ सध्याची प्रणाली संलग्न (इंटिग्रेट) होईपर्यंत प्रकल्पाच्या अंमलबजावणीत खंड पडू नये व शेतकऱ्यांना अनुदान वितरणात अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक 13.3.2020 मधून विशेष बाब म्हणून सूट देवून प्रकल्पाचे कोटक महिंद्रा बॅंकेत उघडलेले बॅंक खाते चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
—–०—–

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चैत्यभूमी येथे गर्दी न करता लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे दर्शन घेण्याचे आवाहन

Next Post

भाजपाचे सोमवारी वीजबिल होळी आंदोलन!

Related Posts

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Jcl

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम, संपूर्ण वेळापत्रक वाचा…

April 17, 2026
क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’! सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
Next Post
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच ;  13 नोव्हेंबरला भाजपाचे चुन भाकर आंदोलन

भाजपाचे सोमवारी वीजबिल होळी आंदोलन!

ताज्या बातम्या

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

April 18, 2026
Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

April 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us