पुणे, – बिहार निवडणुकीत भाजप आणि नितीशकुमार युतीने सत्तेच्या दिशेने वाटचाल झाली असतांना खासदार शरद पवार यांनी तेजस्वी यादव यांच कौतुक केले आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बिहार निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या जागा वाढल्याचा दावा केला जात आहे. याबाबत पवार यांना विचारलं असता आमच्या डोक्यात ही गोष्ट आली नव्हती ती आणून दिल्या बद्दल धन्यवाद… असा टोला शरद पवारांनी लगावला. बिहार राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देत तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं. मी जी संपूर्ण प्रचारमोहीम पाहिली त्यानुसार स्वत: पंतप्रधान यामध्ये खूप रस घेत होते.आम्ही या निवडणुकीत जास्त लक्ष दिलं नाही असंही ते यावेळी बोलत होते.














