मुक्ताईनगर,(प्रतिनिधी)- मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परिसरातील अनेक गावातील भाजपा पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी काल दि. ६रोजी एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून भाजपाच्या शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे.
















