युवानेते मंगेश चव्हाण यांचा पर्यावरण पूरक उपक्रम
चाळीसगाव – पर्यावरणातील सर्वात ज्वलंत समस्या ही प्लास्टिक कचरा समस्या आहे. प्लास्टिक पिशव्यांच्या माध्यमातून होत असणारा कचरा हा प्रचंड घातक असतो. एका प्लास्टिक पिशवीला नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात. तसेच समुद्रात 90% कचरा हा प्लास्टिक पिशवी व प्लास्टिक बाटलीचा आहे. ही समस्या लक्षात घेऊन युवानेते मंगेश चव्हाण यांच्या मार्फत बाजारपेठ येथे कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी युवानेते मंगेश चव्हाण मा.जी.पं.स.सदस्य सतिश पाटे, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, नगरसेवक भास्कर पाटील, चेतन चव्हाण, अखलाख खाटीक आदी उपस्थित होते.