- समाज स्वावलंबी झाला तरच देशाचा खरा विकास -निर्लेप उद्योग समूहाचे अध्यक्ष राम भोगले यांंचे प्रतिपादन
ज्येष्ठ समाजसेवक आर. सी बाफना , उद्योगपती अशोक जैन, स्विटी पाटे, हभप ज्ञानेश्वर माऊली, न्यायमूर्ती संगीतराव पाटील, विश्वासराव पाटील, डॉ.आरती हुजुरबाजार ,वैशाली सूर्यवंशी,उदेसिंग पवार, नारायण अग्रवाल , राजेश ठोंबरे,यांचे सह चाळीस मान्यवरांना खान्देश रत्न पुरस्कार - आपले अलौकिक कर्तुत्व समाजाला दिशादर्शक – खा. उन्मेष दादा पाटील
चाळीसगाव – आपल्या परिसरात उद्योग व्यवसाय वाढीस लागावे अशी मानसिकता तयार करावयाची असल्यास आधी उद्योजक होण्याचे धाडस उराशी बाळगून उद्योग करावा लागेल कारण हजार रुपयांचा व्यवसाय सुरू केला तर त्याला हजार रुपयांची अडचण निर्माण होईल लाखात उद्योग असला तर त्यांची लाखात अडचण निर्माण होते. कोटीत उद्योग अस तर त्याला कोटी रुपयांची समस्या निर्माण होते. या समस्या आणि आर्थिक संकटांना तोंड देताना उराशी धाडस असेल तर उद्योग क्षेत्रात माणूस टिकून राहू शकतो. एकदा उद्योग बुडाला की नव्याने उभे राहण्याची हिम्मत असेल तरच यशस्वी उद्योजक होता येईल. अनिल अंबानी, विजय मल्ल्या यांच्याकडून कुठे तरी चुका झाल्यात त्यातून त्यांनी धाडसाने उद्योग व्यवसाय वाचविण्यासाठी धडपड केली. ही धडपड आणि धाडस असले तरच यशस्वी उद्योजक होता येईल अशी भावना निर्लेप उद्योग समूहाचे अध्यक्ष राम भोगले यांनी आज येथे केले. खासदार उन्मेष पाटील यांच्या संकल्पनेतून
शहरातील राजपूत मंगल कार्यालयात सोमवारी भाजप युवा मोर्चाच्या वतीने खान्देशाच्या कर्तृत्ववान भूमिपुत्राचा सन्मान करण्यासाठी ’खान्देश रत्न’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर खासदार उन्मेष पाटील,उमंग महिला परिवाराच्या अध्यक्षा संपदा पाटील माजी न्यायमूर्ती संगीत राव पाटील, शाकाहाराचे प्रणेते आर सी बाफना, सहकार महर्षी उदेसिंग राजपूत, शिक्षण महर्षी नारायण भाऊ अग्रवाल, योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे,
भाजप तालुकाध्यक्ष के बी दादा साळुंखे, लोकनियुक्त नगराध्यक्षा आशालता चव्हाण, पंचायत समितीच्या सभापती स्मितल बोरसे, पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे नेते संजय पाटील उपसभापती संजय पाटील ,प्राचार्य प्रा.डॉ.एस आर जाधव, प्राचार्य डॉ. एम व्हि बिलदीकर , रोटरी मिलेनियम अध्यक्ष संदीप जैन ,जेसीआयचे अध्यक्ष अफसर खाटीक ,ग्रंथपाल अण्णा धुमाळ ,समर्थ हॉस्पिटल चे संचालक डॉ. राहुल देव वाघ स्वयदीप संस्थेच्या व दिव्यांग परिवाराच्या सर्वेसर्वा मीनाक्षी निकम, नगरसेविका वत्सलाबाई महाले, भाजपा महिला आघाडीच्या नमो ताई राठोड ,नगरसेवक चिरागोद्दिन शेख, ज्येष्ठ रंग कर्मी सूनिताताई घाटे
यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रोहन सुर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. खासदार उन्मेष पाटील यांनी राम भोगले यांचा
जीवन प्रवास श्रोत्यांसमोर मांडला.
उद्योगपती राम भोगले पुढे म्हणाले की एक व्यक्ती समाजिक स्थितीत बदल घडवून आणू शकत नाही, सरकारमध्ये योग्य मानसिकतेचे असले पाहीजे, सरकार चांगले असेल अंतर योग्य विचार करणारे व्यक्ती भेटतील. ते देशाकडे पाहून निर्णय घेतात. तेव्हाच देशाचा खरा विकास होतो, अशा व्यक्तिंच्या पाठीशी सर्वांनी उभे राहीले पाहीजे, असे आवाहन करून ते म्हणाले की
स्वत:चे समाजिक, आर्थिक प्रश्न सोडवण्याची क्षमता, जिद्द स्वत:मध्ये निर्माण होईल, तेव्हा सरकारी योजना, अधिकारी यांचे समाजातील स्थान कमी होईल. ब्रिटिशांनी सरकारवर अवलंबून राहाण्याची मानसिकता भारतीयांमध्ये तयार केली आहे. ही प्रवृत्ती आता आपल्याला सोडायची आहे. स्वावलंबी समाज जेव्हा निर्माण होईल, तेव्हाच खरा विकास साधला जाईल, असे सांगत देशातील राजकारण बदलत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
पुरस्कार सोहळ्याची सुरूवात आर.सी. बाफना यांना पुरस्कार देऊन करण्यात आली. यावेळी जलतज्ञ डॉ. माधवराव चितळे, जैन समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, ह.भप. ज्ञानेश्वर माऊली, उदेसिंग पवार, नारायण अग्रवाल, कृषिभूषण विश्वासराव पाटील, मॅगसेसे पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा, माजी न्यायमूर्ती संगितराव पाटील, तिहेरी महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, समाजसेविका डॉ.आरती हुजूरबाजार, कै. रामराव जिभाऊ पाटील, डॉ. हेमांगी पुर्णपात्रे, आरोग्य दूत रामेश्वर नाईक, मेजर जनरल स्व. अ. वि. नातू, वसंतराव चंद्रात्रे, कृषिभूषण अनिल भोकरे, मीनाक्षी निकम , कथ्थक नृत्यांगना कविता बागुल, आंतरराष्ट्रीय बासरी वादक पंडित विवेक सोनार, सर्प तज्ञ राजेश ठोंबरे यांच्यासह खान्देशातील भूमिपुत्रांना गौरवण्यात आले. कार्यक्रमासाठी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.
संसदेत भरीव कामगिरी करावी -आर सी बाफना
याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत आर सी बाफना यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की दोन गायी सांभाळणे कठीण असताना आमच्या गो शाळेत चार हजार गायी आहेत. खानदेशात अनेक रत्न आहेत मात्र या रत्नाची पारख करणारा देखील असावा लागतो राजकारणात समाजसेवेचे दृष्टी असणारे उन्मेष पाटील यांनी या खान्देश रत्नांना शोधून त्यांचा सत्कार केल्याने खरे खान्देश रत्न उन्मेष पाटील असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राजकारणात मी अनेक कार्यकर्ते पुढारी बघितले मात्र तरुण तडफदार उन्मेष पाटील यांच्या सारखा समाजसेवी खासदार मिळाल्याचे समाधान असून देशाच्या सर्वोच्च सदनात आपण भरीव काम करावे. अशी अपेक्षा व्यक्त केली.
आपले अलौकिक कर्तुत्व समाजाला दिशादर्शक -खा.उन्मेष दादा पाटील
आज ज्या खान्देशातील रत्नांचा सत्कार केला जातो आहे त्यांचे जीवन व अलौकिक काम समाजाने आदर्श घ्यावा असेच आहे. अशा कार्यक्रमातून तरुणांना स्फूर्ती व समाजाला प्रेरणा मिळते, निस्वार्थ वृत्तीने जगलेल्या व्यक्तिंचा मोठेपणा अंगिकारावा. त्यांच्या कार्यातून त्यांच्या विचारांची उंची कळते. आजच्या तरूण पिढीने आत्मविश्वासाने जीवनात वाटचाल करावी. खान्देशातील या रत्नांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन खासदार उन्मेष दादा पाटील यांनी केले.
खान्देश रत्नाच्या कार्याचा आम्हाला हेवा -संपदा पाटील
आज ज्या चाळीस खान्देश रत्नांचा गौरव करण्यात येतो आहे त्यांचे अलौकिक कर्तुत्व,आपल्या मातृभूमी सह देशसेवेसाठी मोलाचे योगदान व दीपस्तंभ सारखे आहे. एेतिहासिक वारसा लाभलेल्या खान्देशातील भूमिपुत्रांनी आपल्या प्रतिभेने व सामाजिक जाणिवेतून ही परंपरा व लोकसेवेला अनन्य महत्व देऊन खानदेशाला जगात सन्मान प्राप्त करून दिला आहे. असा असामान्य व्यक्तिमत्वा च्या कार्याचा आम्हाला हेवा असून आजच्या सत्कारातून समाजाला प्रेरणा मिळणार आहे. अशी भावना उमंग च्या संपदा पाटील यांनी मनोगतात व्यक्त केली.
घरचा सत्कार गुणदोषासह -अविनाश शिरोडे
अंतराळ संशोधन संस्थेच्या अनेक प्रकल्पांना भेटी दिल्या. त्यात अनेक सत्कार व सन्मान मिळाले मात्र हे पुरस्कार देताना आमचे गुण बघितले गेले मात्र जेव्हा घरच्या लोकांकडून सत्कार केला जातो तेव्हा तो आमच्या गुण दोषा सकट दिला जातो अशी कृतद्यता अविनाश शिरोडे यांनी व्यक्त केली तर माजी डी वाय एस पी उत्तमराव राठोड यांनी आजचा सत्कार माझ्या बंजारा समाजाला अर्पण करीत असल्याची भावना व्यक्त केली. राजेश ठोंबरे, मीनाक्षी निकम, प्रकाश पाटे, कविता बागुल यांच्या सह अनेक पुरस्कारार्थी यांनी मनोगत व्यक्त केली.
यांनी घेतले परिश्रम….
आजच्या कार्यक्रमाला आर पी आय जिल्हाप्रमुख नगरसेवक आनंद खरात, जी प सदस्या मंगलताई जाधव, पंचायत समितीचे सदस्य सुनील पाटील, सुभाष पाटील, नगरसेविका विजया पवार, विजया भिकन पवार, नगरसेवक सोंमसिंग राजपूत, बापूसाहेब आहिरे, रोशन जाधव, सुवर्णा ताई राजपूत, विजया पाटीलयशस्वीतेसाठी भाजप युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी तसेच जिल्हा उपाध्यक्ष सर्वश्री अमोल चव्हाण , हर्षल चौधरी, गिरीश बर्हाटे , सचिन पवार, समकित छाजेड, संजय पवार,प्रशांत वाघ,फय्याज शेख, अर्जुन पाटील, नयन राजपूत, पप्पू राजपूत, कपिल पाटील, अनिल चव्हाण , गिरीश आहिरे, अजय वाणी, अमित सुराणा रवींद्र चौधरी , बंडू पगार, यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले, सूत्रसंचलन प्रा. विजय गर्गे व संगीता देव यांनी केले तर आभार युवा मोर्चा शहराध्यक्ष अक्षय मराठे यांनी मानले.