रावेर, (प्रतिनिधी)- तालुक्यातील निंभोरा स्टेशन येथील भाजप आणि सहकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर, बोदवड बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोडे, दुर्गादास पाटील , मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्ष सुनिल कोंडे, तालुका उपाध्यक्ष संदीप खाचणे, वाय डी पाटील आदी जण उपस्थित होते.