कोल्हापूर – गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांसाठी महाविकास आघाडी सरकारकडून गेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देऊन पाठवण्यात आलेली १२ सदस्यांची नावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नाकारणार असल्याच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व राज्यपाल यांच्यात झालेल्या चर्चेत हे ठरलं आहे असा गौप्यस्फोट राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलतांना केला.