गौरवकुमार पाटील / अमळनेर – तालुक्यातील तांदळी येथील प्रेम प्रकरणातून लग्न झालेल्या १९ वर्षीय विवाहितेला संगनमताने डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न करणारे सासरकडील व पतीच्या मित्राविरुद्ध असे पांच जणांवर कालच मारवड पोलीस ठाण्यात विविध १० कलमांनव्ये गुन्हा दाखल झाला होता ,ते सर्व आरोपींनी पळ काढला असून फरार झाले आहेत त्यांचे शोधार्थ दोन पोलीस पथक नियुक्त करण्यात आले असून त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
तांदळी येथील प्रेमी युगलाचे विवाह बंधनात रूपांतर होऊन अवघे पाच महिने झाले आतांनाच या आंतर जातीय प्रेम विवाहाला सासारकडील मंडळींला मनात द्वेश ठेवून पीडित १९ वर्षीय अश्विनीने दुर्लक्ष करीत सुखी संसाराकडे वाट धरली मात्र जेठाणी, सासू व पती यांचे वारंवार मुलीला टोचून बोलणे , तिला मानसिक त्रास देने सुरूच होते शेवटी त्या वादातून पुन्हा दिनांक २१ रोजी रात्री ठिणगी पडली आणि पहाटे दिनांक २२ रोजी सकाळी त्या महिलेला जबर मारहाण करून डिझेल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला व गावातीलच माहेरी आईवडिलांकडे मित्रांचा मदतीने केस ओढत मारहाण करीत तिच्या आईवडिलांनाही शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली शेवटी १९ वर्षीय पीडित अश्विनी निलेश परदेशीने पोलीस ठाणे गाठून महिला दक्षता समितीचे सदस्यांच्या उपस्थितीत जबाब नोंदविल्याने पती निलेश परदेशी , जेठाणी आशाबाई परदेशी,सासू देवकाबाई परदेशी,
व पतीचे दोन मित्र अजय परदेशी सर्व राहणार तांदळी व निलेश राजेंद्र पाटील राहणार गोवर्धन ता अमळनेर यांचे विरुद्ध मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न आशा विविध १० कलमांनव्ये मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता , घटनास्थळी डीवायएसपी राकेश जाधव व तपासी अधिकारी राहुल फुला यांनी धाव घेऊन पंचनामा केला मात्र पोलिसांची येण्याची चुणूक लागल्याने गुन्ह्यातील सर्व आरोपी फरार झाले त्यांचा दोन दिवस झाले पोलिसांनी शोध घेतला तरी ते मिळून न आल्याने अखेर एपीआय राहुल फुला यांच्या मार्गदर्शनाने दोन पोलीस पथक शोधार्थ नियुक्त करण्यात आले असून त्यात सहाय्यक फौजदार रोहिदास जाधव ,फिरोज बागवान , सचिन निकम तर दुसऱ्या पथकात पोलीस नाईक सुनील तेली ,सुनील अगोने ,अनिल राठोड यांना विशेष मार्गदर्शक सूचना करून पाठविले आहे , त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत