रावेर/जळगाव – शहरा पासून रावेर बोरखेडा रस्त्यावरील शेत शिवारात चार भावंडांची निघृण हत्या केल्याचा भयंकर प्रकार काल दि १६ रोजी सकाळी उघडकीस आला असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे आज दुपारी 3 ते 4 या वेळेत बोरखेडा, ता. रावेर येथे भेट देणार आहेत.
या हत्येमुळे संपुर्ण जिल्हा हादरला आहे .यात मुलींचा समावेश आहे.या प्रकरणी कालच पाच संशयितांना अटक देखील केली आहे.