मुंबई : काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी तीन दिवसांपूर्वी हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघाले होते. परंतु दोघांनाही ग्रेटर नोएडा येथील परी चौकात थांबवून पुन्हा दिल्लीला पाठवले. तिथे राहुल गांधी यांच्यासोबत धक्काबुक्की देखील झाली होती त्यासोबतच प्रियंका गांधी यांना देखील पोलिसांनी धक्काबुक्की केल्यानं तेथील पोलीस प्रशासन व सरकारच्या कृत्याने सर्वत्र निषेध होत असतांना मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून “ह्याची इतिहासात नोंद होईल आणि भविष्य माफ करणार नाही” असे म्हटलं आहे.
राहुल गांधी काल पुन्हा हाथरसला जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटून न्याय मिळेपर्यंत सोबत असल्याचा विश्वास दिला आहे.दरम्यान तीन दिवसापूर्वी पोलिसांनी दिलेली वागणूक कधीही विसरता येणार नाही असा सुरु उमटला आहे.
















