खडके बु (वार्ताहर)- खडके बु ता एरंडोल येथिल ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली, यावेळी सोशल डिस्टिंग चे पालन करत महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्य सौ आशाबाई पाटील,व शोभाबाई पाटील,,यांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत चे लोकनियुक्त सरपंच सौ शीतल पाटील व सदस्य तथा माजी उपसरपंच श्री सुनिल पाटील व निंबा पाटील व दीपक पाटील पत्रकार वाल्मीक पाटील सह ग्रामस्थ उपस्थित होते.
















