एरंडोल – तालुक्यातील फरकांडे येथिल ग्रामपंचायती तर्फे १६ रोजी मंगळवारी गुरुपौर्णिमाच्या दिवशी फरकांडे गृप ग्रामपंचायततर्फे फरकांडे गावांतील विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष साधना माध्यमिक – उच्च माध्यमिक व व्यवसाय शिक्षण महाविद्यालय कासोद्याचे प्र.मुख्याध्यापक जी.के.सावंत होते .तर विशेष म्हणजे गुणवंतांमध्ये सर्वात जास्त साधना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी- विद्यार्थीनी होतें.असा स्तुत्य उपक्रम सर्व ग्रामपंचायतींनी करावा म्हणजे आपल्या गावातील विद्यार्थी- विद्यार्थीनींना जोमाने अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा जी.के.सावंत सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली .. या कार्यक्रमा अभावी ..एल.टी. पाटील तसेच
भारती विद्यामंदिर कासोदा येथील. प्र. मुख्याध्यापक राजेंद्र ठाकरे , सरपंच सौ.किरण साहेबराव पाटील, पत्रकार शालीग्राम पाटील, विद्यार्थी, विद्यार्थिनी , पालक ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.