
त्यांनी सांगितले की संपुर्ण विश्व कोरोना संकटाने ग्रस्त झालेले आहे. तसेच सर्वांना माहिती आहे की चिन देशातील उहान शहराच्या मांसाहार मार्केट मधून याचा फैलाव झाला आहे. या महामारीने लाखों लोकांचे जीवन संकटात टाकले आहे. विश्वातील 175 देशांना याने ग्रासले आहे. अजूनही ही महामारी आहे. आपल्या सदृढ शरीर स्वास्थ्यासाठी शाकाहार अवलंबवा. मांसाहाराने मॅड काऊ, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू व आता कोरोना महामारी जगाला भेट स्वरुपात दिला आहे. संपुर्ण जगात पोल्ट्री उद्योग वृद्धिंगत होत आहे. विश्वातील वैज्ञानिकांनी हे लक्षात आणून दिले आहे की पुढील महामारी ही याच पोल्ट्री उद्योगांमुळे संपूर्ण विश्वात पसरेल व जगातील लोकसंख्या कमी होऊन जाईल. त्या मुळे आपण शाकाहारी बनू शकता, मांसाहार करु नये असे नम्र आवाहन आर.सी.बाफना ज्वेलर्सचे संचालक रतनलाल सी. बाफणा यांनी केले आहे.