जळगाव, (प्रतिनिधी) – येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे कर्मचारी यांचे चालू असलेल्या लेखणी बंद आंदोलन यास राष्ट्रवादी काँग्रेस महानगर जळगाव यांनी लेखी पाठिंबा जाहीर केला तसेच या कर्मचाऱ्यांचे आ खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या शी विडिओ कॉल वर बोलणे घालून त्या च्या संपूर्ण समस्या सांगण्यात आल्या .या वेळी खासदार सुप्रियाताई नी येत्या बुधवारी मुंबई येथे या कर्मचाऱ्यांची बैठक मा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच उच्चतंत्र शिक्षण मंत्री मा ना उदय सामंत यांच्या समवेत आयोजित केली असल्याचे सांगितले व या वर त्वरित निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले .या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव शहर चे जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील , सचिव कुणाल पवार तसेच युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेमाडे विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे समन्वयक रमेश शिंदे दुर्योधन साळुंखे अरुण सपकाळे राजू सोनवणे सौ मांडोळे यांच्या सह आंदोलन करणारे कर्मचारी उपस्थित होते.