पाचोरा, (प्रतिनिधी)- तालुक्यातील बांबरुड येथील सुमनताई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे आणखी एक सर्व सुविधा युक्त १०० रुग्णांना क्षमतेचे कोविड केयर सेंटर चे काम अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये नवीन पद्धतीचे कॉटस, गादी,बेडशीट,उशी,तसेच प्रत्येक रुग्णाला स्वतंत्र टेबल आणि खुर्ची देखील देण्यात येणार आहे. वरील सर्व सुविधांचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. तसेच या ठिकाणी आवश्यक बाब म्हणून ऑक्सिजन सुविधा युक्त ५ बेड्स तयार करण्यात येणार आहेत. वरील सर्व कामकाज हे विविध दानशूर व्यक्तींच्या मदती द्वारे करण्यात येत आहे. कोणत्याही शासकीय निधी शिवाय १०० रुग्ण क्षमतेचे आधुनिक प्रकारचे हे जिल्ह्यातील पहिलेच सेंटर असणार आहे. सेंटर चे कामकाज मुदतीत पूर्ण होण्यासाठी सर्व महसूल , आरोग्य, नगरपालिका यंत्रणा परिश्रम घेत आहे.