Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अधिकतेकडून उत्तमतेकडे ‘लोकराज्य’ चा जुलै महिन्याचा अंक प्रकाशित

najarkaid by najarkaid
July 17, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव;- गेल्या पाच वर्षात शासनाने अनेक महत्वाकांक्षी योजना आखल्या, निर्णय घेतले आणि त्यांची तत्परतेने अंमलबजावणी केली. राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या यशकथांचा समावेश असलेला ‘लोकराज्य’ मासिकाचा ‘अधिकतेकडून उत्तमतेकडे’ हा जुलै महिन्याचा अंक प्रकाशित झाला आहे.  

या अंकात जळगाव जिल्ह्यातील शासनाच्या स्वाधार योजनेचा लाभ मिळाल्यामुळे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करु शकलेली ममुराबाद येथील विद्यार्थीनी तेजस्विनी आरखे, रोजगार व उद्योजकता विभागाकडून कौशल्य प्राप्त करुन लघु उद्योगाचे मालक बनलेले जळगाव येथील दर्शन वानखेडे, माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ मिळाल्यामुळे मुलीच्या शिक्षणाची चिंता मिटल्याचा आनंद व्यक्त करणारे शिरसोली येथील राजेश बारी, उन्नत शेती, समृध्द शेतकरी योजनेचा लाभ मिळालेले काकोडा, (ता. मुक्ताईनगर) येथील शेतकरी शांताराम चोपडे यांच्या यशकथांचा समावेश आहे.

लोकराज्य च्या या अंकाचे अतिथी संपादक राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) वने, आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके हे आहेत. त्याचबरोबर शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा संकल्प आणि सिध्दी, तसेच राज्याच्या 2019 च्या अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांचा समन्यायी विकास साध्य व्हावा यासाठी विविध योजनांसाठी करण्यात आलेल्या भरघोस तरतुदींची माहिती सर्वजन सुखाय या लेखात देण्यात आली आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या हितासाठी, समृध्दीच्या फळबागा, उन्न्त शेती,जलसमृध्दी, मिशन शौर्य, स्वत:च्या घराचे सुख, स्वाधार:शिकणे सुलभ, कौशल्यातून रोजगाराकडे, आता, आम्ही समर्थ, सुरक्षित आरोग्य, लक्ष्मी आली दारी, कामगार कल्याण योजनांवर आधारित यशकथांचा समावेश या अंकात आहे. या अंकाची किंमत फक्त दहा रुपये असून हा अंक वाचकांसाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध आहे.

लोकराज्य मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त शंभर रुपये आहे.  वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी वाचकांनी जिल्हा माहिती कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, पहिला मजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव अथवा उप माहिती कार्यालय, स्टेट बँक इमारत, भडगाव रोड, चाळीसगाव येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा नियोजन समितीची १९ रोजी  पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Next Post

शहरातील रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्यासाठी महापौर- उपमहापौरांनीं घेतला अधिकाऱ्यांचा क्लास 

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us