मुबंई, (मंत्रालय प्रतिनिधी चेतन महाजन)- महाराष्ट्र माळी समाज महासंघ व भाजपा.ओबीसी मोर्चाची zoom app बैठक दिनांक 14 जून रविवारी रोजी सायंकाळी 6 वाजता उत्साहात संपन्न झाली,ही बैठक महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन यांच्या नेतृत्वात पार पडली,या बैठकीत प्रमुख वक्ते म्हणून ओबीसी चे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार संजय कुटे,राज्यसभा खासदार.डॉ विकास महात्मे,भाजपा.ओबीसी मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष विकास आण्णा रासकर,नाशिक मध्य चे आमदार देवयानी ताई फरांदे, यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन माळी समाज बांधवांना केले असून केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती ही सविस्तरपणे सांगितली व झूम अँप द्वारे असलेल्या बैठकीत माळी समाजातील प्रमुख लोकांनी वक्त्यांशी प्रश्न विचारले मान्यवरांनी समाज बांधवांच्या प्रश्नाला उत्तरे देऊन मोलाचे मार्गदर्शन केले असून त्यात महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन यांनी मान्यवरांना एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात आणून दिला की
*ओबीसी समाजाचा जे UPSC चे 150 विद्यार्थी सिलेक्ट झाले आहेत ह त्यांचा नियुक्त्या अचानक केंद्र सरकारने रद्द केल्यामुळे त्या सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त करावे व MPSC मध्ये ही ओबीसी उमेदवारांना न्याय मिळावा त्यावर पाठपुरावा करून त्या विद्यार्थ्यांचे सीलेक्शन व्हावे अशी मागणी महाजन यांनी केली,
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा,MPSC परीक्षेत ओबीसींचा दर्जा व टक्का वाढवावा,मुंबईत क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व्हावे ,ओबीसींना शिष्यवृत्ती मिळावी अश्या अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या,यावर मान्यवरांनी सांगितले की या विषयांवर राज्य सरकारचे लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितले,यावेळी राज्यभरातून महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे पदाधिकारी व माळी समाजाचे प्रमुख वैचारिक पातळीचे पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते,महाराष्ट्र माळी समाज महासंघाचा माध्यमातून अश्या प्रकारच्या बैठका माळी समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी आयोजित होतील असे प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन यांनी सांगितले,माळी समाजाच्या व्यासपीठावर लोकप्रतिनिधींना उपस्थित केल्याबद्दल अनिल महाजन व विकास आण्णा रासकर यांचे माळी समाजातील सर्वत्र कौतुक केलं जात आहे.