जळगाव, (प्रतिनिधी)- कोविड-१९ विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असल्याने रुग्णांच्या अडीअडचणी सोडवणे व त्यांनी केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करिता आज पासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे “वॉर रूम”स्थापन करण्यात आले आहे.
वॉर रूममध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी, रुग्णांनी संपर्क साधण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 0257-2217193 व टोल फ्री क्रमांक 1077 कार्यान्वित करण्यात आले आहे. सकाळी 7 ते रात्री 11 यावेळत नागरिकांना आपल्या अडीअडचणी व प्रश्न मांडता येणार आहे. त्याच बरोबर जिल्हा सामान्य रुग्णालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून दूरध्वनी क्रमांक 0257-2242111 कार्यान्वित करण्यात आले आहे.