फैजपूर: पंढरपूर येथे आषाढि यात्रा महोत्सव लाखो वारकरी बांधवांचे उपस्थिती त संपन्न होत आहे दिगंबर महाराज चिनवलकर याचे मठात सुद्धा सुमारे दोन हजार भाविक यावल व रावेर तालुक्यतुन भाविक पोहचले आहे आज मुक्ताई संस्थन पालखी सोहळ्याचे प्रमुख ह भ प रवींद्र महाराज हरणे यांचे कीर्तन संपन्न झाले , त्यांनी सांगितले मानवी जीवनाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्याचे सर्व मार्गदर्शन संतांनी केले आहे त्याचा अंगीकार आपण करावा व जीवन सुखी बनवावे असे हभप रविंद्र महाराज यांनी सांगितले..
कार्यक्रमास ह भ प विशाल महाराज खोले, ह भ प नितीन महाराज अहिर, ह भ प दुर्गादास महाराज नेहते , दिनकर महाराज पाटील संस्था अध्यक्ष नरेन्द्र नारखेडे ,उपाध्यक्ष घनश्याम पाटील, सचिव विठ्ठल भंगाळे, विजय ढा के, किशोर बोरोले, विनायक गारसे, प्रमोद इंगळे डिगंबर बऱ्हाटे, पंडित कोल्हे ,यात्रा महोत्सव वात माजी आ. शिरीष चौधरी यांनी भेट देऊन दिवस भर सर्व कार्यक्रमास सहभागी होऊन परमार्थ आनंद घेतला. मठात भागवत कथा सुरू असून ह भ प दत्तात्रय महाराज गुरव कथा सांगत आहे .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशवस्थ मंडळ परिश्रम घेत असून त्यांचे समवेत भास्कर इंगळे,जनार्दन भारंबे ,नरेंद्र चौधरी, तुळशीराम धांडे ,भगवान चौधरी, खानापूर हे जबाबदारी सांभाळत आहे.