जळगाव, (प्रतिनिधी)- आदर्श गाव ताडे येथे कोरोना पॉसीटीव्ह रुग्ण सापडल्याने गावकऱ्यांचे आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणुन येथील ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीकांत मधुकर पाटील व त्यांचे लहान बंधु डॉ.चंद्रकांत मधुकर पाटील यांनी आयुष मंत्रालया द्वारे निर्देशित रोगप्रतिकार शक्ती वर्धक आर्सेनिक अल्बम ह्या होमिओपॅथिक औषधींचे गावातील सर्व कुटुंबांना घरपोच मोफत वाटप केले व कोरोनाविषयी मार्गदर्शन करून ग्रामस्थांच्या मनातील भीती व गैरसमज दुर करत आरोग्य टिकविण्यासाठी खबरदारीचे उपाय सांगितले जसे मास्क व रुमाल वापरणे,साबणाने हात स्वच्छ धुणे,व गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टनसिग चा वापर करणे तसेच भीती न बाळगता काळजी घेण्याचे आव्हान केले.
या कामी अंगणवाडी सेविका ,आशासेविका,आरोग्यसेविका,आरोग्यसेवक,पोलीस पाटील यांनी सहकार्य केले.