पाचोरा, (प्रतिनिधी)- येथे आगामी रमजान ईद अनुषंगाने पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी पाचोरा येथील मौलवी व मुस्लिम समाजाचे प्रमुख पदाधिकारी यांची मिटिंग पो स्टे ला घेण्यात आली. सदर बैठकित जिल्हाधिकारी यांचे दिनाक 17 रोजीचे आदेशाबाबत उपस्थित मुस्लिम समाजबांधवांना रमजान ईदचे रोजी ईदगाहवर एकत्र येऊन अथवा सामुदायीकरित्या नमाजपठण करण्यात येणार नसलेबाबत अवगत करण्यात आले.
बैठकितील उपस्थित बांधवांचे शंका निरसन करुन आदेशाबाबत विस्तृत माहिती देऊन उपस्थितांना सीआरपीसी कलम 149 अन्वयेची नोटीस देण्यात आली. तसेच महाराष्ट्र शासन अल्पसंख्यांक विभाग यांचेकडील परिपत्रक प्रत देण्यात आली.