भुसावळ, (प्रतिनिधी) – राज्यातील कोरोना मुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करत ‘भाजपने माझे अंगण माझे रणांगण’ महाराष्ट्र बचाव आंदोलनाची हाक दिली . भाजपचे हे आंदोलन म्हणजे एक प्रकारचे नाटक असून राज्याला आज नाटकाची नाही तर सहकार्याची गरज आहे . अशी प्रतिक्रिया जळगाव जिल्हा कॉंग्रेस कमिटी अनु .जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी दिली आहे ‘ असे त्यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
कोरोनविरुध्द महाराष्ट्र विकास आघाडी सरकार प्राणपणाने लढत असतांना देखील राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याचा भाजपचा हा डाव आहे असे ही नरवाडे यांनी म्हटले आहे.