रावेर,(विनोद कोळी)- शहरातल्या बारी वाडा भागातील एक 60 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळला असून रावेर शहरात पहिल्यांदाच कोरोना रुग्ण आढळल्याने कोरोनाचा शिरकाव आता ग्रामीण भागातही होतांना दिसत आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरातील बारी वाडा परिसरातील असल्याने प्रशासनाने परिसर सील करण्याची तयारी सुरू केली आहे.
सदर रुग्णाचे खोकला, सर्दी,तापचे लक्षणे आढळल्याने वैद्यकीय अधिकारी यांनी त्याचे तीन दिवसापूर्वी स्लॅब तपासणी साठी पाठवले होते. त्यास रावेर येथील कोविड केअर सेंटर येथे कॉरंटाईन करून ठेवण्यात आले होते त्या रुग्णाचे आज रिपोर्ट पोझिटीव्ह आला आहे. सदर रुग्णावर रावेर येथील शासकीय रुग्णालयात उपचार होतील असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.